सांगली : दत्त इंडिया साखर कारखान्याने ऊसदर जाहीर न करताच कारखाना सुरू केला आहे. तसेच गेल्या हंगामातील दुसरा १०० रुपयांचा हप्ता न दिल्याबद्दल ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत धरणे आंदोलन केले. तब्बल दोन तास कार्यकर्ते गव्हाणीत बसले. मात्र, निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी समोर आले नाहीत. आंदोलन करून कारखाना बंद पाडण्यात आला. आता याप्रश्नी शुक्रवारी (ता. २२) बैठक होणार आहे. त्यामध्ये चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख पदाधिकारी दुपारी दत्त इंडिया साखर कारखान्यावर एकत्रित आले. त्यांनी प्रशासनाला दराबाबत जाब विचारला. त्यानंतर संतप्त कार्यकर्ते थेट गव्हाणीत गेले. त्यामुळे कारखान्याचे कामकाज ठप्प झाले. यांदरम्यान, पोलिसही दाखल झाले. यावेळी अधिकारी व आंदोलकांत वादावादी झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून ‘दत्त इंडिया’चे मालक धारू यांच्याशी चर्चा करून येत्या शुक्रवारी संघटनेशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, दिलीप माने, अमोल माने, आनंदा पाटील, सुनील यादव, आनंदा माळी, संभाजी माने, प्रकाश गडकरी, एकनाथ माने आंदोलनात सहभागी होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.