छत्रपती संभाजीनगर : निवडणूक प्रचारात देवगिरी कारखान्याचा मुद्दा केंद्रस्थानी !

छत्रपती संभाजीनगर : गेल्या पंधरा वर्षांपासून देवगिरी सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत केंद्रस्थानी राहिला आहे. कारखाना सुरू करण्याचे आश्वासन सर्वांकडूनच दिले जाते. यंदा, २०२४ च्या निवडणुकीतही महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख पक्षांकडून हेच आश्वासन दिले गेले. प्रत्यक्षात कारखान्याची चाके हललीच नाहीत. आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार कारखान्याभोवतीच फिरत आहे. गेली पंधरा वर्षे कारखाना बंद असल्याने परिसरातील ऊस लागवडही घटली आहे.

कारखाना सुरू झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी एकमेकांवर देवगिरी कारखाना सुरू करण्यासंदर्भात चिखलफेक केली. डॉ. कल्याण काळे यांनी चारवेळा फुलंब्री विधानसभा निवडणूक लढविली होती. तब्बल वीस वर्षांनंतर काँग्रेसने विलास औताडे यांच्या रूपाने उमेदवार रिंगणात उभा केला. तर भाजपकडून १९८५ पासून हरिभाऊ बागडे यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. यावेळी बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here