मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशात ऊस गाळप हंगाम सुरू होताच शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संघटनांकडून उसाच्या दरात वाढ करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. उसाला प्रति क्विंटल ४५० रुपये भाव (एसएपी) मिळावा या मागणीसाठी बीकेयू अराजकीय संगटनेने मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरकारी आंतर महाविद्यालयाच्या मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून संघटनेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे असलेले मागणीपत्र शहर दंडाधिकारी विकास कश्यप यांना दिले. उसाला प्रती क्विंटल ४५० रुपये भाव देण्याची मागणी संघटनेने केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
शेतकऱ्यांनी सांगितले की, उसाची किंमत साखरेच्या किमतीवर आधारित नसून सह-उत्पादनावर आधारित असावी. उसापासून इथेनॉल, साखर, मद्य, वीज, गॅस आदींची निर्मिती केली जात आहे. महागाई निर्देशांकापेक्षा शेतीचा खर्च दरवर्षी वाढत आहे. उत्पादन खर्च जास्त असल्याने सध्याच्या भावामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. उसाचा भाव अद्याप ठरलेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसापासून बनविलेल्या सर्वच पदार्थांचे दर वाढले आहेत. खते, कीटकनाशके, तणनाशके आणि शेतीच्या मजुरीमध्ये सुमारे २५ टक्के वाढ झाल्यामुळे ऊस उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. विनीत त्यागी, संजीव सेहरावत, बिट्टू त्यागी, विनय त्यागी, अवधेश त्यागी, दिनेश त्यागी, कपिल त्यागी, मोहित त्यागी, झाकीर त्यागी उपस्थित होते.