कोल्हापूर : ओंकार शुगर डिस्टिलरी पॉवर युनिट कारखान्याने गेल्यावर्षी ११२ दिवसांत २.४० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य केले. कारखान्याने १२.५१ साखर उताऱ्यासह ३.१ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. चालू गळीत हंगामात चार लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखाना ८.५ मेगावॅटचा को- जन प्रकल्पही सुरू करीत आहे. कारखाना इतरांप्रमाणे जास्तीत जास्त दर देणार आहे, अशी ग्वाही जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील यांनी दिली.
फराळे (ता. राधानगरी) येथील ओंकार शुगरच्या दुसऱ्या बॉयलर अग्निप्रदीपन, मोळी व काटा पूजन सोहळा कार्यक्रमात जनरल मॅनेजर पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन ओमराजे बोत्रे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक प्रशांत दादासाहेब बोत्रे पाटील होते. यावेळी ११ महिला ऊस उत्पादक शेतकरी महिलांच्या हस्ते मोळी पूजन करून गव्हाणीत ऊस टाकण्यात आला. जनरल मॅनेजर पाटील यांनी सांगितले की, बाबूराव बोत्रे पाटील यांनी राज्यातील अडचणीतील व अरिष्टातील कारखान्यांना तसेच शेतकरी व कामगारांना आर्थिक पाठबळ देऊन न्याय दिला आहे. कार्यक्रमास विनायक पाटील, राजेंद्रकुमार पाटील, शरद पाटील, रोहित जाधव, ज्ञानदेव पाटील, वैशाली संदीप डवर, तुकाराम परीट, विलास पाटील आदी उपस्थित होते. शेती अधिकारी समीरकुमार व्हरकट यांनी स्वागत केले. विश्वास आरडे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल यादव यांनी आभार मानले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.