फिलिपाइन्स : SRA चा साखर आयात न केल्याचा दावा दिशाभूल करणार असल्याचा NFSP चा आरोप

बॅकोलॉड सिटी : पुढील वर्षीच्या पिक हंगामाच्या शेवटपर्यंत साखर आयात न करण्याच्या साखर नियामक प्रशासन (SRA) आणि कृषी विभागाच्या दाव्याने दिशाभूल केली जात आहे, असे आरोप नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरकेन प्लांटर्स (NFSP)ने नोंदवला आहे. NFSP चे अध्यक्ष एन्रिक डी. रोजास यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे, आम्हालाही सुरुवातीला आनंद झाला की, कोणतीही अतिरिक्त आयात केलेली साखर देशात येणार नाही. परंतु एसआएने आधीच प्रक्रिया केलेली साखर आयात केली आहे हे आम्हाला माहीत नव्हते.SRA पूर्णपणे पारदर्शक कारभार करत नसल्याचा आरोप रोजस यांनी केला. त्यांनी म्हटला आहे की, एजन्सीने साखर ऑर्डर क्रमांक ५, मालिका २०२३-२४ अंतर्गत १३५,८३३ मेट्रिक टन (MT) शुद्ध साखर आधीच आयात केली आहे. त्याच आदेशानुसार १,०४,१६७ मेट्रिक टन साखर अजूनही आयात केली जाऊ शकते. ज्याअंतर्गत एकूण २,४०,००० मेट्रिक टन साखर आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

रोजस म्हणाले की, २०२३-२४ पीक वर्षात जे घडले, त्याप्रमाणेच साखरेच्या अत्याधिक आयातीमुळे देशांतर्गत साखरेच्या किमती घसरल्या. गेल्या पीक वर्षातील अतिरिक्त रक्कमेमुळे चालू वर्षात साखरेचे दर कमी ठेवले गेले आहेत. एसआरएच्या साखर पुरवठा आणि मागणी परिस्थितीच्या अहवालानुसार, पीक वर्ष २०२४-२५ ची सुरुवात २,७०,२९५ एमटी कच्ची साखर, २,३०,२८७ एमटी स्थानिक पातळीवर उत्पादित रिफाइंड साखर आणि ७७,६९२ एमटी आयातित रिफाईंड साखरेच्या साठ्याने झाली. तर २० ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात, स्थानिक कारखान्यांनी ६९,४७० मेट्रिक टन कच्च्या साखरेचे आणि १,३१३.९५ मेट्रिक टन रिफाइंड साखरेचे उत्पादन केले होते. त्याच अहवालात असे दिसून आले आहे की, मागील पीक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत, कच्च्या साखरेचा उतारा १८.३८ टक्के कमी झाला आहे, तर शुद्ध साखरेच्या उताऱ्यात २०.१८ टक्क्यांनी कमी झाला आहे. सलग तीन आठवडे साखरेचे दर घसरत असल्याचे रोजस यांनी सांगितले.

त्यांनी हवाईयन साखर कारखान्यातील घसरलेल्या किमतींचा उल्लेख केला, जेथे २४ ऑक्टोबर रोजी PHP २,९८०.८८ प्रती बॅगवरून १५ नोव्हेंबरपर्यंत PHP २,८१५.०० पर्यंत किमती घसरल्या. प्रती बॅग PHP १६४ ची घट दिसून आली आहे. फर्स्ट फार्मर्स मिलमध्ये, याच कालावधीत PHP १७३.९८ प्रती बॅगने घट झाली असून किंमती PHP २,९८१.९२ वरून PHP २,८०७.९४ पर्यंत घसरल्या. विकमिको, लोपेज, सागे, सोनेडको, ला कार्लोटा और बिस्कॉमसह इतर कारखान्यांत गेल्या तीन आठवड्यांत PHP ११० ते १३५ पर्यंतची घसरण दिसून आली आहे. रोजास म्हणाले की, आयात न करण्याचे विधान आणि मागील पीक वर्षाच्या तुलनेत साखरेचे कमी उत्पादन, साखर ऑर्डर क्रमांक ५ अंतर्गत २,४०,००० मेट्रिक टन आयात झाल्यामुळे साखरेच्या किमतीत घसरण सुरूच आहे. एनएफएसपीने साखर परिषदेच्या १८ नोव्हेंबरच्या विधानाला पाठिंबा दिला, ज्यामध्ये साखरेच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याबद्दल एसआरएकडून स्पष्टीकरण मागितले. सरकारी प्राधिकरण म्हणून एसआरएने आपली जबाबदारी पार पाडावी असे त्यांनी आवाहन केले.

तत्पूर्वी, एसआरएचे प्रशासक पाब्लो लुईस अझकोना यांनी साखरेच्या अती पुरवठ्याच्या आरोपांचे खंडन केले होते. काही समुहांनी किंमत घसरल्याबद्दल त्यास दोष दिला आहे. सोमवारी दिलेल्या निवेदनात अझकोना यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या साठ्याची पातळी स्थिर आहे. जादा पुरवठ्यामुळे किमती घसरत आहेत, असे दावे चुकीचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here