नांदेड विभागात आतापर्यंत २५ साखर कारखान्यांनी घेतला गाळप परवाना

नांदेड : नांदेड विभागातील २५ कारखान्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळाची थकित रक्कम भरल्यामुळे त्यांना गाळप परवाना मिळाला आहे. तर विभागातील चार कारखान्यांचा परवाना प्रलंबित आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे एकूण २९ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०२४-२५ साठी गाळप परवानासाठी अर्ज केले आहेत अशी माहिती सहसंचालक सचिन रावल यांनी दिली. विभागातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यांमध्ये १९ खासगी तर १० सहकारी कारखान्यांचा समावेश आहे.

विभागातील ट्वेंटीवन शुगर लि. शिवनी (ता. लोहा), विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखाना लातूर, श्री लक्ष्मी नरसिंह शुगर एलएलपी अमडापूर (ता. परभणी) व टोकाई सहकारी कारखाना लि. कुरुंदा (ता. वसमतनगर) यांना परवाना मिळाला नाही. विभागात गाळप हंगाम लवकरच सुरू होत आहे. यासाठी कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले. परंतु ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची थकीत रक्कम भरलेल्या साखर कारखान्यांचेच अर्ज साखर आयुक्तांकडे गाळप परवान्यासाठी पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २५ कारखान्यांचे अर्ज पाठविले होते. त्यांना परवाना मिळाला. तर चार कारखान्यांनी महामंडळाची रक्कम भरलेली नसल्याने त्यांचा परवाना प्रलंबित असल्याची माहिती रावल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here