नॅचरल शुगर कडून रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने रेडिअम रिफ्लेक्टर फलकाचे वाटप

१५ नोव्हेंबर पासून कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रेलर, ट्रक यांचा वापर करण्यात येतो. रात्रीच्या अंधारामध्ये वाहतुकीदरम्यान इतर वाहन चालकांना ट्रेलरचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याकारणाने असे अपघात होऊ नये त्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा सप्ताह नॅचरल शुगरच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. सदर उपक्रमांतर्गत नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड रांजणी कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक बी बी ठोंबरे यांच्या हस्ते साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर टायर बैलगाडी, ट्रॅक्टर ट्रेलर या वाहनांना रेडिअम रिफ्लेक्टर फलकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमामध्ये उपस्थित वाहन चालकांना नशापाणी न करता वाहन चालवणे, रस्ते अपघात रोखण्याच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी बाबत चेअरमन बी बी ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जनरल मॅनेजर उद्धव दिवेकर, केन मॅनेजर मदन सूर्यवंशी, ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर, ऊस पुरवठा अधिकारी अरुण वाघमारे, सुरक्षा अधिकारी भारत भोरे, केन यार्ड सुपरवायझर सुनील गायकवाड तसेच ट्रॅक्टर चालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here