‘शाहू कागल’चे ११ लाख मे. टन गळीताचे उद्दिष्ट : शाहू ग्रुप अध्यक्ष समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक कर्नाटकचे ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक, संचालिका व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते गव्हाणीत विधिवत उसाची मोळी टाकून करण्यात आला. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्यापासून ‘शाहू’मध्ये साखर कारखानदारीत होत असलेले बदल स्वीकारण्यासह भविष्याचा वेध घेऊन नियोजन करण्याची परंपरा व्यवस्थापनाने जोपासली आहे. त्यानुसार पुढील दहा वर्षांत साखर उद्योग, सहकारी साखर कारखानदारी यांच्यासमोर कोणती आव्हाने असतील व त्याला आपण कशा पद्धतीने सामोरे जाऊ याच्यासह ऊस गाळप, इथेनॉल निर्मिती व नवीन उपपदार्थ निर्मिती अशा पुढील दहा वर्षांच्या वाटचालीची ब्ल्यू प्रिंट तयार आहे, अशी माहिती घाटगे यांनी दिली.

शाहू साखर कारखान्याने या गळीत हंगामामध्ये अकरा लाख मे. टन ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी सर्व ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी गव्हाण पूजा ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील आणि त्यांच्या पत्नी आशाराणी पाटील, सत्यनारायण पूजा प्रताप पाटील व त्यांच्या पत्नी संचालिका रेखाताई पाटील, तर काटा पूजन संचालक शिवाजीराव पाटील आणि आनंदी पाटील यांच्या हस्ते झाले. संचालक डॉ. डी. एस. पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here