शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी श्री गुरुदत्त शुगर्स सातत्याने प्रयत्नशील : अध्यक्ष माधवराव घाटगे

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी श्री गुरुदत्त शुगर्स सातत्याने प्रयत्नशील राहिला आहे. गुरुदत्त शुगर्स व शेतकऱ्यांचे अतुट नाते तयार झाले आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून यंदाच्या गळीत हंगामात उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम ठेवत असून शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त ऊस गाळपास पाठवावा, असे आवाहन श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले.कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ व मोळी पूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी घाटगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, संचालक व मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून हंगामाचा प्रारंभ केला.

घाटगे म्हणाले, गेली वीस वर्षे कारखान्याने अनेक टप्पे पार पाडत आज साखर उद्योगात भरारी घेतली आहे. शेतकरी व कारखाना ही साखर उद्योगाची दोन चाके असून तो व्यवस्थित चालली तरच साखर कारखानदारी टिकणार आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम लवकर सुरु होण्यासाठी शेतकरी संघटनेने सामंजस्याची भूमिका घेऊन गळीत हंगाम सुरु करण्यास सहकार्य करावे. प्रास्ताविक संचालक बबन चौगुले यांनी केले. जिल्हा परिषद माजी सदस्य अशोकराव माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जिल्हा परिषद माजी सदस्य विजय भोजे, दत्त नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने-देशमुख, शिरोळ भाजपचे अध्यक्ष मुकुंद गावडे, शिरोळचे नगरसेवक डॉ. अरविंद माने, श्रीवर्धन माने, दादासाहेब कोळी, संभाजी भोसले, सुरेश सासणे, अन्वर जमादार, महेश देवताळे, शिवाजी सांगले, दिलीप माणगावे, शाम बंडगर, सदाशिव आंबी, प्रवीण माणगावे, बजरंग कुंभार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here