श्री रेणुका शुगर्सकडून मॉरिशसस्थित उपकंपनीतील भागभांडवलाची विक्री

नवी दिल्ली : श्री रेणुका शुगर्स लिमिटेडने (Shree Renuka Sugars Limited) आपल्या संपूर्ण मालकीची उपकंपनी रेणुका कमोडिटीज डीएमसीसीने मॉरिशसस्थित श्री रेणुका ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड (एसआरजीव्हीएल) मधील उर्वरित १७.१ टक्के स्टेक फ्रीवे ट्रेडिंग लिमिटेड (एफटीएल) ला ४,३२५ डॉलर्समध्ये विकले आहेत. श्री रेणुका शुगर्स लिमिटेडने शनिवारी ही माहिती दिली. शुक्रवारी हा करार निश्चित झाल्याचे सांगम्यात आले. यापूर्वी २०१९ मध्ये, कंपनीने एसआरजीव्हीएलमधील ८२.९ टक्के हिस्सा एफटीएलला विकला होता. रेणुका- दुबईने केलेल्या या विक्रीचा परिणाम म्हणून, एसआरजीव्हीएल आणि त्याच्या स्टेप-डाउन उपकंपन्या २२ नोव्हेंबर २०२४ पासून कंपनीच्या सहयोगी नसतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here