सहारनपुर (उत्तर प्रदेश) : उसाचे पाचट व पाला जाळल्याने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सरकार अत्यंत गांभीर्याने पावले उचलत आहे. जिल्हा प्रशासन आणि ऊस विभागाकडूनही शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. मात्र तरीही ही समस्या संपत नसल्याची स्थिती आहे. मनाई केल्यानंतरही उसाचा पाला पेटविण्याच्या घटना सॅटेलाईटच्या माध्यमातून उघडकीस आल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे.
एसडीएम दीपक कुमार यांनी प्रादेशिक अधिकाऱ्यांना हे गांभीर्याने घेण्याचे, सरकारी आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. एसडीएम दीपक कुमार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी पाचट जाळल्यास दोन एकरपर्यंत ५ हजार रुपये, पाच एकरांसाठी १० हजार रुपये आणि १० एकरसाठी १५ हजार रुपये दंड आणि गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.