बीड जिल्ह्यातून ४ लाख ऊसतोड कामगारांचे स्थलांतर

बीड : विधानसभा निवडणुका संपताच जिल्ह्यातून जवळपास ४ लाख ऊसतोड मजुरांचे स्थलांतर होत झाले आहे. ऊसतोड कामगारांचे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न आजही कायम आहेत. जिल्ह्यातील धारूर, पाटोदा, वडवणी, माजलगाव, आष्टी, गेवराई, बीड, यासह अन्य तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूरांचे स्थलांतर दरवर्षी होत असते. गतवर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूरांचे स्थलांतर झाले होते. तर यावर्षीही जिल्हाभरातून जवळपास ४ लाख मजूर स्थलांतर करीत असल्याची माहिती ऊसतोड कामगराचे नेते प्रदीप भांगे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, कर्नाटक यासह अन्य राज्यामध्ये ऊसतोडीसाठी जात असतात. त्यामुळे जिल्हयात मुकादमांची संख्या जवळपास २५ हजार आहे. महाराष्ट्रापेक्षा अन्य राज्यांमध्ये मजूरी जास्त देण्यात येत असल्यामुळे जिल्हयातील कामगार अन्य राज्यामध्ये अधिक प्रमाणात जातात. काही वर्षांपूर्वी शासनाने ऊसतोडीला जाणाऱ्या मजूरांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कामगारांसाठी स्थापन करण्यात आले स्व. गोपीनाथराव मुंडे महामंडळाकडून कामगारांचा विम्यासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारण्यात येत आहेत. या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. महिला कामगारांना मिळणाऱ्या सुविधांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here