छत्रपती संभाजीनगर : श्रीक्षेत्र चौडाळा (ता. पैठण) येथील श्री रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ च्या नवव्या गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तथा कारखान्याचे संचालक राजु नाना भुमरे व व्हा.चेअरमन नंदू पठाडे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा झाली.
खा. संदीपान भुमरे यांनी बंद पडलेला कारखाना सुरू केला. मागील वर्षी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित आमदार विलास भुमरे यांनी चेअरमनपद स्वीकारल्यानंतर मागील हंगाम यशस्वीरित्या पार पडला. गोदावरी नदी काठच्या गावामध्ये उसाचे प्रमाण जास्त असल्याने कारखाना सुरू ठेवणे शक्य झाले आहे. यावेळी लक्ष्मण डाग, विष्णू नवथर, नितीन तांबे, भीमराव वाकडे, दिलीप बोडखे, अफसर शेख, सुभाष गोजरे, सुभाषराव चावरे, भरत पवार, अमोल थोरे, कल्याण धायकर, नाना गाभूळ, भारत लांडगे, ज्ञानदेव बढे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, खाते प्रमुख, सभासद, तोडणी मुकादम, शेतकरी कामगार यांची मोठी उपस्थिती होती.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.