कोल्हापूर : शरद सहकारी साखर कारखाना सहकारातील आदर्श कारखाना ठरू पाहत आहे. कारखान्याने शेतकरी हिताला नेहमी प्राधान्य दिले आहे. चांगला दर व उसाची वेळेत बिले अदा करण्याची – परंपरा शरद साखरने कायम ठेवली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे संचालक आदित्य पाटील-यड्रावकर यांनी केले. शरद सहकारी साखर कारखान्याच्या २३ व्या गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष थवा कांबळे, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील, त्रिशला पाटील, स्फूर्ती पाटील, यड्राव बँकेचे अध्यक्ष अजय पाटील-यड्रावकर, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, भोला कागले, बापू दळवी, रणजित पाटील, रमेश भुजबडे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी मोळी पूजन करून गव्हाणीत टाकण्यात आली. यावेळी संचालक डी. बी. पिष्टे, अप्पासाहेब चौगुले, पोपट भोकरे, गुंडा इरकर, रावसाहेब चौगुले, अजित उपाध्ये, सुरेश शहापुरे, श्रीपती सावंत, तहसीलदार गुरुजी, विश्वास बालीघाटे, बशीर फकीर, जालंधर ठमके, चंद्रकांत जोग, जवाहर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी उपस्थित होते. संचालक सुभाषसिंग राजपूत यांनी स्वागत केले. संचालक संजय नांदणे यांनी आभार मानले. यावेळी ऊस उत्पादक, कर्मचारी उपस्थित होते.