धाराशिव : ‘नॅचरल शुगर’च्या सेंद्रीय खत प्रकल्पाचा शुभारंभ

धाराशिव : नॅचरल उद्योग व नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांची दूरदृष्टी व कल्पकता कौतुकास्पद आहे. तरूण उद्योजकांना त्यांनी नवी उमेद निर्माण केली आहे. नॅचरल उद्योगातील सेंद्रीय खत, पोटॅश खत, सल्फर निर्मिती ही उत्पादने शेतीसाठी वरदान आहेत, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त विद्या शितोळे यांनी केले. रांजणी येथील नॅचरल उद्योगात मंगळवारी उभारलेल्या किण्वय प्रक्रिया केलेले सेंद्रीय खत (एफओएम) या प्रकल्पाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नॅचरल उद्योगाचे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले की, सद्यस्थितीत गोठ्यातील गुरांची संख्या कमी झाल्यामुळे शेणखतासारख्या सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी झालेली आहे. शेतकऱ्यांकडून फक्त रासायनिक खतांचा वापर केला जातो, परिणामी जमिनी क्षारपड होत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने किण्वन प्रक्रिया केलेले सेंद्रिय (एफओएम) खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना रासायनिक खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने नॅचरल शुगर कारखान्याने सेंद्रिय खत अर्थात फर्मेटेड ऑरगॅनिक मॅन्युअर (एफओएम) उत्पादित करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक ज्ञानेश्वरराव काळदाते, संचालक पांडुरंग आवाड, हर्षल ठोंबरे, कारखान्याचे जनरल मॅनेजर यू. डी. दिवेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here