मुंबई : 28 नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. आयटी आणि ऑटो समभागांमध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 2 महिन्यांतील एकाच दिवसातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. दोन्ही निर्देशांक जवळपास 1.5 टक्क्यांनी घसरले. कमकुवत जागतिक संकेत, यूएस फेडरल रिझर्व्ह धोरणाबाबत चिंता आणि F&O मधील मासिक एक्सपायरीमुळे बाजारात पडझड झाल्याचे दिसले. आजच्या क्रॅशमुळे BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित 2.7 लाख कोटी रुपये बाजार भांडवल स्वाहा झाले. BSE सेन्सेक्स 1,190 अंकांनी किंवा 1.5 टक्क्यांनी घसरून 79,044 वर तर NSE निफ्टी 361 अंकांनी घसरून 23,914 वर बंद झाला.
गुरुवारच्या सत्रात आयटी समभागात मोठी पडझड झाल्याचे दिसले. निफ्टी आयटी निर्देशांक तब्बल 2.4 टक्क्यांनी घसरला. इन्फोसिस (-3.5 टक्के), टीसीएस (-1.8 टक्के), आणि एचसीएल टेक (-2.5 टक्के) मध्ये सर्वाधिक नुकसान झाले.महिंद्रा अँड महिंद्रा (-3.4 टक्के) ने ऑटो सेक्टरच्या घसरणीचे नेतृत्व केले. यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आणखी कपात करणार नाही या अपेक्षेवर भारतीय बाजारांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली