सांगली : ऊस तोडणी कामगारांची ग्रीन पॉवर शुगर्सतर्फे आरोग्य तपासणी

सांगली : ग्रीन पॉवर शुगर्स गोपूज साखर कारखान्याच्यावतीने ऊस गळीत हंगाम २०२४- २५ मध्ये ऊस तोडणी वाहतुकीसाठी आलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सुचनेनुसार ऊस तोडणी कामगार, वाहतूकदारांची आरोग्य तपासणी कारखाना कार्यस्थळावर झाली. पळशी (औंध) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यंदाच्या हंगामात तीन टप्प्यांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.

आरोग्य तपासणीवेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पळशीचे आरोग्य अधिकारी डॉ. संकेत मोरे, आरोग्य सहाय्यक डॉ. घाडगे, कारखान्याचे जनरल मॅनेजर हणमंत जाधव, जनरल मॅनेजर (केन) मनोहर मिसाळ, प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव, लेबर ऑफिसर विनोद यादव, ऊसविकास अधिकारी अमोल साठे, हेड टाईम कीपर संतोष जाधव, सुरक्षा अधिकारी धनाजी आमले आदींसह आरोग्य सेविका, सेवक, आशा वर्कर, मदतनीस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here