परभणी : श्री लक्ष्मी नसिंह शुगरने प्रती टन २,७०० रुपयांची पहिली उचल देण्याची शेतकऱ्याची मागणी

परभणी : आमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर कारखान्याने यंदाच्या, गळीत हंगाम २०२४-२५ मधील उसाला प्रतिटन ३,००० रुपये एफआरपी जाहीर करावी, पहिली उचल प्रती टन २,७०० रुपये द्यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलास बाबर यांनी केली आहे. याचबरोबर कारखान्याने गेल्या गाळप हंगामातील, २०२३-२४ मधील थकित देणी तत्काळ शेतकऱ्यांना अदा करावीत अशी मागणीही करण्यात आली आहे. एक महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी थकित देणी प्रकरणी ठिय्या आंदोलन केल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन केवळ १०० रुपये जमा केले. परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे प्रतिटन २०० रुपये थकित आहेत. ते तत्काळ मिळावेत अशी मागणी बाबर यांनी केली.

भाजप नेते बाबर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री लक्ष्मी नृसिंह शुगर कारखान्याना प्रशासनाने शेतकऱ्यांना प्रती टन २,७०० रुपये दर देण्याचे आश्वानसन दिले होते. प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांना प्रती टन २,५०० रुपये, तर काहींना प्रती टन २,६०० रुपये दिले. शेतकऱ्यांची थकित देणी दिल्याशिवाय कारखान्यास गाळप परवाना देण्यात येऊ नये, अशी मागणी केलेली असताना नांदेड येथील साखर सहसंचालकांनी गाळपाचा परवाना दिला कसा असा सवाल निवेदनात केला आहे. यंदाच्या गाळप हंगामातील उसाला प्रतिटन ३ हजार रुपये जाहीर करून पहिली उचल प्रतिटन २ हजार ७०० रुपये द्यावी. अन्यथा शेतकरी आंदोलन करतील, असे बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here