पुणे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ऊस पिकासाठी ११५६ कोटींचे कर्जवाटप

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील ८७,६४७ सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत तब्बल ११५६ कोटी ६० लाख ७६ हजार रुपयांचे पिक कर्ज वाटप केले आहे. यंदा ७४,०४७ हेक्टरसाठी ऊस उत्पादकांना पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. बँकेने जिल्ह्यातील खरीप, रब्बी हंगामांतील पिकांसाठी एकूण २,७४२ कोटी १ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी सर्वाधिक पीक कर्जाचे हे ऊस उत्पादकांना करण्यात आले आहे. जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या ३०० शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी कर्जपुरवठा करते.

याबाबत पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले की, पीक आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उसासाठी पीक कर्ज घेतात. जुन्नर, आंबेगाव, दौंड, इंदापूर, बारामती आणि शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याचा फायदा अनेक शेतकरी घेतात. जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्हा बँकेने ८२ हजार ९२८ ऊस उत्पादकांना ७० हजार २०७ हेक्टरसाठी १०९३ कोटी ६४ लाख ९ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. तर रब्बी हंगामात ४ हजार ७१९ ऊस उत्पादकांना ३ हजार ८४० हेक्टरसाठी ६२ कोटी ९६ लाख ६८ हजार रुपयांचे पीकवाटप केले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सर्वाधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here