गोवा : संजीवनी साखर कारखाना बंद पडल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य अधांतरी

पणजी : राज्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना २०१९ मध्ये बंद झाल्यानंतर शेकडो ऊस उत्पादक शेतकरी भवितव्याबाबत चिंतेत आहेत. राज्य सरकारने गोव्यात ऊस उत्पादन सुरू ठेवण्यासाठी जुनी उपकरणे बदलून आधुनिक यंत्रसामग्री किंवा इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात ऊस उत्पादकांसाठी काहीही काम झाले नाही. विशेषत: सांगे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भविष्य अनिश्चिततेने भरलेले आहे. साळावली धरणाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा करण्यासाठी सांगेच्या कुर्दीश गावातील मूळ रहिवाशांचे वेडे आणि वालंकिणी येथे पुनर्वसन करण्यात आले, तेव्हा सांगेमध्ये उसाचे उत्पादन सुरू झाले. यापैकी बहुतांश विस्थापित लोकांनी उसाची लागवड केली, ज्यामुळे सांगे हा गोव्यातील सर्वात मोठा ऊस उत्पादक तालुका बनला.

ऑल गोवा शुगरकेन ग्रोअर्स असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आणि सांगेचे प्रगतीशील शेतकरी फ्रान्सिस्को मस्कारेन्हास यांनी सांगितले की, संजीवनी साखर कारखाना बंद पडल्यामुळे गेल्या पाच वर्षांत सांगे तालुक्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन करणे बंद सोडले आहे. उर्वरित ७०० ऊस उत्पादकांपैकी अनेकांनी ऊस लागवडीत फारसा रस दाखवलेला नाही. सांगे तालुक्यातही उसाच्या लागवडीत लक्षणीय घट झाली आहे. २०१९-२० मध्ये सांगे तालुक्यात सुमारे २८,००० टन उसाचे उत्पादन झाले होते. चालू पीक हंगामात हे उत्पादन सुमारे १०,००० टन इतके घसरले आहे, असे मस्कारेन्हास यांनी सांगितले.

जोसिन्हो डिकोस्टा या आणखी एका शेतकऱ्याने सांगितले की, एकीकडे सरकार तरुणांना शेती करण्यास उद्युक्त करते, तर दुसरीकडे विद्यमान शेतकरी त्यांच्या उदरनिर्वाहाबाबत अनिश्चित आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील आव्हाने सांगताना, मास्कारेन्हास म्हणाले की, शेतीमध्ये एका पिकातून दुसऱ्या पिकाकडे जाणे हे इतर पिकांसारखे सोपे नाही. शेतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. एका पिकाकडून दुसऱ्या पिकाकडे वळताना सरकारला नवीन पिकासाठी परिणाम देण्याची गरज असते. शेतकऱ्यांसमोरील दुसरा पर्याय म्हणजे नारळाची लागवड करणे. परंतु उपद्रवी माकडांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

इतर अडचणींकडे लक्ष वेधून जोसिन्हो डिकोस्टा म्हणाले, जेव्हा शेती चांगली होती, तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले होते. बँकांनीही उसाच्या लागवडीच्या आधारे कर्ज दिले होते. मात्र, संजीवनी साखर कारखाना बंद झाल्यापासून बँका व इतर सहकारी संस्थांनी आम्हाला कर्ज देणे बंद केले असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येऊ शकतात. संजीवनी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाची शाश्वती नसल्याने गेल्या काही वर्षांपासून मी उसाचे उत्पादन कमी करून इतर पिके घेण्यास सुरुवात केली आहे.

चालू हंगामात नुकसान भरपाईचा पाच वर्षांचा कालावधी संपत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आपल्या व्यवसाय आणि उदरनिर्वाहाच्या चिंतेत आहेत. संजीवनी साखर कारखान्याचे गाळप सुरू होईपर्यंत नुकसान भरपाई देणे सुरू ठेवावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी १० डिसेंबर रोजी संजीवनी साखर कारखान्यात बैठकीचे नियोजन केले आहे. फ्रान्सिस्को मस्कारेन्हास म्हणाले की, संजीवनी साखर कारखाना सुरू होईपर्यंत सध्याची नुकसान भरपाई चालू ठेवण्याची मागणी करून सांगे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि कृषीमंत्र्यांना निवेदन देणार आहेत. मस्कारेन्हास म्हणाले की, सांगे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अजूनही आशावादी आहेत की सरकार संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करेल. तरच गोव्यातील ऊस उत्पादकांचे सोनेरी दिवस परत येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here