सांगली : पुणे येथे व्ही. एस. आय. मध्ये होणाऱ्या ऊस शेती ज्ञानयाग चार दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत कारखाना कार्यक्षेत्रातील ३० ऊस उत्पादक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. हे शेतकरी नुकतेच प्रशिक्षणासाठी रवाना झाले. यावेळी कारखाना कार्यस्थळावर वाहनांचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोसले, संचालक पंढरीनाथ घाडगे, जालिंदर महाडिक, दिलीपराव सूर्यवंशी, तानाजी शिंदे, जगन्नाथ माळी, संभाजी जगताप, कार्यकारी संचालक एस. एफ. कदम, ऊस उत्पादक, सभासद उपस्थित होते.
आजअखेर कारखान्याने ६३० पुरुष व १७८ महिला असे एकूण ८०८ शेतकऱ्यांना कारखान्याच्या स्वखर्चाने प्रशिक्षणास पाठवले आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये माती पाणी परीक्षण महत्त्व, खते व पाणी व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर, स्वयंचलित ठिबक सिंचन आदी विषयांवर प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर प्रशिक्षण वर्ग चार दिवस चालणार असून सदर शेतकऱ्यांना प्रशिक्षणानंतर याचा चांगला फायदा होणार आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.