सातारा : कृष्णा कारखाना नेहमीच साखर उद्योगात होत असलेल्या बदलांचा स्वीकार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करतो. कारखान्यात या गळीत हंगामात शुगर सिरपपासून उत्पादित झालेल्या इथेनॉलचा पुरवठा ऑइल कंपन्यांना करण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करून ऑईल कंपनीकडे टँकर रवाना करण्यात आला. या वर्षीही कृष्णा कारखान्याने एक कोटी लिटर्स इथेनॉलची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती अध्यक्ष भोसले यांनी दिली.
इथेनॉल टँकर पूजन प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासाहेब शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, कार्यकारी संचालक महावीर घोडके, माजी संचालक गिरीश पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
इथेनॉल इंडस्ट्रीच्या संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.