अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील ओंकार शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा. लि युनिट नं ७ चा हंगाम २४ ते २५ बॉयलर अग्निप्रदिपन व मोळी पुजन सोहळा बाबुराव बोत्रे, रेखा बोत्रे तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या अकरा मुलीच्या हस्ते करण्यात आला. कारखाना शेतकऱ्यांसाठी कामधेनू आहे. योग्य बाजारभाव, योग्य नियोजन, कामगार, उस वाहतूकदार, ऊस तोडणी यंत्रणा, बैंक कर्ज व्याज ही पंचसूत्री डोळ्यासमोर ठेवूनच कारखानदारी करावी लागते. जिल्ह्यात सर्वात जास्त दर देत सहकारी कारखान्यांपुढे आदर्श उभा केल्याचे मत कारखान्याचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे –पाटील यांनी व्यक्त केले.‘गौरी शुगर’चे सरव्यवस्थापक रोहीदास यादव म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय बोत्रे यांनी घेतला.
ऊस तोडणीसाठी पैसे देऊ नका : बोत्रे
शेतकऱ्यांच्या ऊसाला जिल्ह्यात उच्चांकी भाव दिला जाईल. ऊसतोडी कामगारांना कुठल्याही प्रकारचे पैसे देऊ नये. त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना होतो. एक दोन दिवस ऊसतोड मागे पुढे होईल, परंतु सर्वांचा ऊस तोडला जाईल, असे बाबुराव बोत्रे-पाटील यांनी जाहीर केले. यावेळी सुधीर घेगडे, अशोक ईश्वरे, सुनिल महाडिक, हभप भास्कर कदम, दिनकर पंदरकर आदींची भाषणे झाली. यावेळी प्रशांत बोत्रे, सचिन चौधरी, रवींद्र शिंदे, काशिनाथ कौठाळे, सतिश घावडे आदीसह शेतकरी उपस्थित होते.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.