सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड कारखान्यामार्फत ऊस विकास योजनेतून बाळभरणी अवजारांचे वितरण

सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंत्रचलित बाळभरणी अवजारांचे वितरण आमदार अरुण लाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, उद्योजक उदय लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड प्रमुख उपस्थित होते.

आमदार लाड म्हणाले, शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन, कारखान्याने मागील २ ते ३ वर्षे प्रयत्न करून, यंत्राद्वारे बाळभरणी करणारे अवजार विकसित केले आहे. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त हे अवजार शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. या अवजारामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होतील, वेळ वाचेल व खर्चात बचत होणार आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप थोरबोले, जयप्रकाश साळुंखे, वैभव पवार, जितेंद्र पाटील, संग्राम जाधव, सुकुमार पाटील, सुभाष वडेर, शीतल बिरनाळे, अनिल पवार, अशोक विभुते, संजय पवार, रामचंद्र देशमुख, विजय पाटील, पोपटराव संकपाळ, कुंडलिक थोरात, सचिव वीरेंद्र देशमुख, विश्वजित पाटील, संभाजी बाबर, नितीन लाड, संभाजी लाड उपस्थित होते. विलास जाधव यांनी स्वागत केले. हर्षल पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here