कोल्हापूर : राज्यात ऊस गाळपाने आता चांगलाच वेग घेतला आहे. आतापर्यंत १८३ साखर कारखाने सुरू झाले आहेत. सद्यस्थितीत ऊस गाळपात राज्यात आतापर्यंत सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या २८ साखर कारखाने सुरू झाल्याची नोंद प्रादेशिक कार्यालयात झाली आहे. २८ साखर कारखान्यांनी ३० लाख २३ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आज सोलापूर जिल्ह्याचे ऊस गाळप अधिक आहे. मात्र, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून गाळपाचा वेगही कमालीचा वाढला आहे.
राज्यातील १९१ साखर कारखान्यांना आतापर्यंत ऊस गाळप परवाने दिले असून आणखी १६-१७ अर्ज शासकीय देणी दिली नसल्याने व इतर कारणावरून पेंडिंग आहेत. राज्यातील सहकारी ९३ व खासगी ९० अशा १८३ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. तर पुणे जिल्ह्यात १४ साखर कारखान्यांनी २८ लाख ५५ हजार मेट्रिक टन आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांचे २७ लाख ८५ हजार मेट्रिक टन गाळप झाले आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.