नवी दिल्ली : देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यामुळे देशात गाळप हंगामाला वेग आला आहे. याबाबत, भारतीय साखर आणि बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (इस्मा)ने दिलेल्या माहितीनुसार चालू हंगाम २०२४-२५ मध्ये १५ डिसेंबर २०२४ अखेर देशात ६१.३९ लाख टन (एलएमटी) साखर उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. मागील वर्षी समान कालावधीत ७४.०५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा ४७७ साखर कारखाने सुरू असून गेल्यावर्षी समान कालावधीत ४९६ कारखाने सुरू होते.
उल्लेखनीय म्हणजे, यावर्षी कर्नाटकातील साखर कारखाने नेहमीपेक्षा सुमारे ७-१२ दिवस उशिराने सुरू झाले आहेत. आणखी एक मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात, गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर कारखाने १५-२० दिवसांनी उशिराने सुरू झाले. तथापि, या प्रमुख राज्यांमध्ये विलंबाने सुरू होत असूनही, कार्यरत कारखान्यांची संख्या आणि संबंधित गाळप दर वेगाने वाढत आहे. इस्माच्या म्हणण्यानुसार, या वर्षी इथेनॉलमध्ये साखरेचा वापर गेल्यावर्षीच्या सुमारे २१.५ LMT पेक्षा वाढून सुमारे ४० LMT पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
खालील तक्त्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या साखर उत्पादनाचा राज्यवार तपशील असा :