उत्तर प्रदेश : चांगल्या उत्पादनासाठी नॅनो युरिया वापरण्याचा शेतकऱ्यांना ऊस आयुक्तांचा सल्ला

शाहजहांपूर : ऊस विकास विभाग आणि इफ्को, नॅनो कंपनी प्रतिनिधींच्या ऑनलाइन बैठका घेऊन शेतकऱ्यांना नॅनो युरियाबाबत जागरूक करा, अशा सूचना ऊस आयुक्तांनी दिल्या आहेत. ऊस आयुक्त प्रभू नारायण सिंह यांच्या अध्यक्षतेखाली इफकोच्या महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या आभासी बैठकीत ऊस आयुक्तांनी कारखानदारांना सूचना केल्या. उसाचे चांगले पीक आणि उत्पादन घेण्यासाठी नॅनो युरिया आणि डीएपीचा वापर करावा. नॅनो युरिया आणि डीएपीच्या वापरामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, उत्पादनातही वाढ होईल, असे ते म्हणाले.

इफ्कोचे विपणन संचालक योगेंद्र कुमार यांनी सांगितले की, सहकारी संस्थांमध्ये इफ्कोच्या उत्पादनांचा वापर वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांना नॅनो युरियाबाबत चांगली माहिती असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात अतिरिक्त ऊस आयुक्त व्ही. के. शुक्ला, सह ऊस आयुक्त अमर सिंह, ऊस संशोधन संस्थेचे डॉ. पी. के. कपिल, जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र मिश्रा व इतर अधिकारी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here