हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
बीसलपूर: किसान सहकारी साखर मिल ५९ हजार क्विंटल साखर निर्यात करणार. यासाठी केंद्र सरकारची अनुमती मिळाली आहे. विभागीय आदेशही मिळाले आहेत. मंगळवारपासून साखरेची निर्यात सुरु होईल. साखर मिल चे जी एम एस डी सिंह म्हणाले की, केंद सरकारने मिलला श्रीलंकेसाठी ५९ हजार क्विंटल साखर निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. साखर मिल संघाचे एम डी विमल दुबे यांचाही या संदर्भात आदेश मिळाला आहे. साखरेच्या निर्यातीची तयारी पूर्ण झाली असून मंगळवारपासून निर्यातीला सुरुवात होईल. जीएम म्हणाले की, इतिहासात पहिल्यांदाच इथली साखर परदेशात जात आहे. याचे पैसे केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार. गोदामाचे प्रभारी शशिकांत मिश्रा यांना या संदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या आहेत.