राष्ट्रीय कृषि उच्चाधिकार समितीच्या निमंत्रकपदी देवेंद्र फडणवीस

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

मुंबई, दि. 2: देशाच्या कृषि क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीच्या निमंत्रकपदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.

आज सायंकाळी या समितीची घोषणा करण्यात आली. ही समिती देशातील कृषि क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुचवणार आहे. श्री. फडणवीस हे निमंत्रक तर कर्नाटक, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय ग्राम विकास आणि पंचायतराज मंत्री हे सदस्य असतील. निती आयोगाचे श्री. रमेशचंद हे सदस्य सचिव असतील. देशातील कृषि क्षेत्राच्या विकासासाठी एक कालबद्ध कार्यक्रम राबवण्यासंदर्भात दोन महिन्यांच्या अवधीत ही समिती आपला अहवाल देणार आहे. त्यासोबतच कृषि क्षेत्राशी निगडित विविध सुधारणांबाबतही या समितीकडून विचारविमर्श केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here