अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याकडून उसाला तीन हजार रुपये भाव जाहीर

अहिल्यानगर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठी येणाऱ्या कार्यक्षेत्रातील उसास प्रतिटन २८०० व २०० रुपये ऊस विकास अनुदान याप्रमाणे ३००० रुपये अॅडव्हान्स प्रतिटन भाव देण्यात येणार असल्याची माहिती राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष तथा कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली.

अध्यक्ष ओहोळ म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसास २०० रुपये प्रमाणे ऊस विकास अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील उसास प्रतिटन २८०० रुपये आणि ऊस विकास अनुदान २०० रुपये असा ३००० रुपये प्रतिटन अॅडव्हान्स भाव मिळणार आहे. तर कार्यक्षेत्राबाहेरील उसास २८०० रुपये प्रतिटन भाव मिळणार आहे. यावर्षीही १० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here