हंगाम २०२३-२४ : महाराष्ट्र, कर्नाटक, बिहारसह इतर राज्यांतील साखर कारखान्यांकडून १०० टक्के ऊस बिले अदा

नवी दिल्ली : भारतातील प्रमुख ऊस उत्पादक राज्यांपैकी महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, पंजाब, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांतील साखर कारखान्यांनी २०२३-२४ या हंगामातील ऊसाची १०० टक्के बिले अदा केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा या राज्यांमधील कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के देय रक्कम दिली आहे.

केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत सांगितले की, देशातील साखर कारखान्यांनी २०२४-२५ या साखर हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती दिली. १३ डिसेंबरपर्यंत, एकूण उसाचे मूल्य ११,१४१ कोटी रुपये होते, त्यापैकी ३,०१५ कोटी रुपये अद्याप बाकी आहेत. मागील २०२३-२४ या साखर हंगामासाठी, १,११,६७४ कोटी रुपयांच्या एकूण उसाच्या थकबाकीपैकी, १३ डिसेंबरपर्यंत सुमारे १,१०,३९९ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. केवळ १,२७५ कोटी रुपये बाकी आहेत. अशा प्रकारे प्रभावीपणे ९९ टक्के बिले अदा करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here