उत्तर प्रदेशात आता ऊस माफियांची खैर नाही, कठोर कारवाई होणार

पिलिभीत : बेकायदेशीर ऊस खरेदी आणि उसाचा तुटवडा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके दिवस-रात्र प्रवास करतील. कुठेही अवैध ऊस खरेदीचे प्रकरण उघडकीस आल्यास संशयितांवर गुन्हे नोंदवले जातील असा इशारा प्रशासनाने दिला आहे. उसाची बेकायदेशीर खरेदी-विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी बरेलीचे विभागीय ऊस अधिकारी, जिल्हा ऊस अधिकारी यांच्या स्तरावरून पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून अहोरात्र नजर ठेवली जात आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यात कुठेही बेकायदेशीरपणे ऊस खरेदीचे प्रकार निदर्शनास आल्यास संशयितावर गुन्हे नोंदवून कारवाई केली जाईल, असे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here