सांगली : येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामात १४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी लागणारी सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणेची उभारणी केली आहे. आपल्या कारखान्याने नेहमीच चांगला दर देण्याची परंपरा जोपासली आहे. हंगामात गळितास आलेल्या उसास पहिला हप्ता ३२०० रुपये प्रतिमेट्रिक टन देण्यात येणार आहे अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार मोहनराव कदम यांनी केले. कारखान्याचे संचालक, महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक शरद कदम उपस्थित होते.
मोहनराव कदम म्हणाले की उर्वरित एफआरपीची रक्कम येणाऱ्या दिवाळीपूर्वी अदा करण्यात येणार आहे. साखर कारखान्याने आजअखेर ३ लाख २८ हजार २२५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. तसेच कारखान्याचे उपपदार्थ प्रकल्प को-जनरेशन व डिस्टीलरी पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. शेतकऱ्यांनी सोनहिरा साखर कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कारखान्याने आत्तापर्यंत उत्तम प्रगती केली आहे. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी आपले कारखान्यास पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.