साखर मिलचे प्रबंध निदेशक यांनी जीपीएस प्रणालीद्वारे केले उस सर्वेक्षणाचे निरीक्षण

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कैथल सहकारी साखर मिलचे प्रबंध निदेशक जगदीप सिंह यांनी बुढाखेडा या गावामध्ये जीपीएस प्रणालीद्वारे खसरा नंबर, किल्ला नंबर याबरोबरच उसाच्या सर्वेक्षणाचे निरिक्षण केले. त्यांनी शेतकर्‍यांना आव्हान केले की, शेतकर्‍यांना उसाचे प्रतिएकर उत्पादन किती हे जाणून घेण्यासाठी त्यांना आपल्या शेताचे वास्तविक क्षेत्रफळ माहिती असणे आवशयक आहे. साखर मिलच्या वतीने पहिल्यांदाच जीपीइस प्रणालीवर आधारित उस पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले. या प्रणालीद्वारे उसाच्या क्षेत्रीय कर्मचार्‍यांद्वारा जीपीएस अ‍ॅप मध्ये खसरा नंबर, किला नंबर नोंदवण्यात येत आहे.

15 जुलै 2019 पर्यंत शेतकर्‍यांनी आपापल्या शेताचा खसरा नंबर व किलानंबर आपल्या संबंधित उस कामदारांना लिहून द्या. ज्यामुळे वेळेत बोंर्डिंग होईल. आणि हरियाणा सरकारच्या ई खरेदी पोर्टलवर उसाच्या पिकाचे सर्वेक्षण वेळेत अपलोड होवू शकेल. शेतीसाठी पाण्याच्या सदुपयोगा संदर्भात माहिती देताना निदेशक जगदीप सिंह यांनी सांगितले की, जमिनीवरील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. शेतकर्‍यांनी पावसाच्या पाण्याचा संचय केला पाहिजे. आणि याबाबतीत इतर शेतकर्‍यांच्यातही जागृती निर्माण केली पाहिजे. यावेळी रामदिया श्योकंद, डॉ. रामपाल, देश राज, सतीश कुमार, ओप्रकाश, शमशेर सिंह, राजेश कुमार, प्रदीप कुमार, रामबीर सिंह, अक्षय कुमार, विजय कुमार व अमरीक सिंह उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here