यह न्यूज़ सुनने के लिए इमेज के निचे के बटन को दबाये
भारतीयत्वाचा पाया असलेल्या पेटीवा ग्रुपने सलाला मध्ये 200 मिलियनचा नैसर्गिक साखर कारखाना उभारण्याचे आयोजिले आहे, अशी माहिती सलाला फ्री झोन कंपनीने दिली. सलाला फ्री झोन आणि पेटीवा ग्रुपने साखर कारखाना उभारण्यासंदर्भातील निवेदन पत्रिकेवर सह्या केल्या आहेत. या निवेदनावर सलाला फ्री झोनचे सीईओ अली ताबुक आणि पेटीवा ग्रुपचे डॉ. पांडे यांनी याबद्दल सोमवारी ट्वीट केले. या ट्वीट मध्ये म्हटले आहे की, या कारखान्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल. या कारखान्यात कॅलरीमुक्त, वंशिकदृष्ट्या सुधारित साखरेची निर्मिैती होणार असल्याचे या ट्वीट मध्ये म्हटले आहे. तसेच सलाला फ्री झोनही यासाठी अर्थिक सहकार्य करायला तयार आहे. तसेच या नव्या गुंवणूकीमुळे एक हजार प्रत्यक्ष रोजगार वितरीत होणार असल्याचेही या ट्वीटमध्ये ताबुक यांनी म्हटले आहे. कंपनीच्या वेबसाईट नुसार, पेटीवा कंपनीने पुढच्या पिढीच्या आरोग्यानुसार अन्नात असणार्या साहित्यावर लक्ष केंद्रीत करण्यावर अधिक भर दिला आहे. आणि त्यानुसार चरबीमुक्त, मधात साखरेचा कमी निर्देशांक, उसाचा वापर करुन केलेली अभिनव प्रक्रीयेची निर्मिती करणार आहे. सलाला मधील पेटीवा चा प्रस्तावित कारखाना ओमानमधील दुसरा साखर निर्मिती
उद्योग आहे. साखरेच्या शुद्धीकरणाच्या पहिल्या प्रकल्पाचा पायाभरणी कार्यक्रम गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सोहार किल्ला आणि फ्रीझोन येथे झाला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे सोहार येथील प्रकल्पाचे निर्मितीक्षमता प्रती वर्षी 1 मिलियन टन असण्याची शक्यता आहे.