मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शुक्रवारी, १० जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजार निर्देशांक घसरला. सेन्सेक्स २४१.३० अंकांनी घसरून ७७,३७८.९१ वर बंद झाला, तर निफ्टी ९५ अंकांनी घसरून २३,४३१.५० वर बंद झाला. निफ्टीमधील टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये सकारात्मकता पाहायला मिळाली तर श्रीराम फायनान्स, इंडसइंड बँक, अदानी एंटरप्रायझेस, एनटीपीसी आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्यात घसरण दिसून आली.
गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स ५२८.२८ अंकांनी घसरून ७७,६२०.२१ वर बंद झाला, तर निफ्टी १६२.४५ अंकांनी घसरून २३,५२६.५० वर बंद झाला होता. गुरुवारच्या बंदच्या तुलनेत शुक्रवारी भारतीय रुपया ८५.९७ प्रति डॉलरवर नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला.