खा. सुप्रिया सुळे यांची साखर कारखान्यांच्या राजकारणात उडी : माळेगाव, सोमेश्वर कारखान्यांवर आज धडकणार

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आता सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात उडी घेतली आहे. आज (दि. ११) त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर धडकणार आहेत. या कारखान्यांनी पहिला हप्ता कमी दिल्याची ऊस उत्पादकांची तक्रार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या २८०० रुपये प्रतिटन या पहिल्या हप्त्याबाबत विचारणा त्या विचारणा करणार आहेत.विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर खा. सुप्रिया सुळे या प्रथमच माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांना भेट देणार आहेत. शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक साखर कारखानदारीत लक्ष घातले. आता खा. सुळे यांची ही ‘एंट्री’ होत असल्याने बारामतीत पुन्हा एकदा ‘पवार विरुध्द पवार’ संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सोमेश्वर कारखान्यात १९९२ पासून शरद पवार यांच्या विचाराचे संचालक मंडळ काम करत होते. शरद पवारांनी स्थानिक राजकारणाची धुरा अजित पवार यांच्याकडे दिल्यानंतर सोमेश्वर, मालेगाव व छत्रपती या स्थानिक सहकारी साखर कारखान्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णपणे राजकीय पकड बसवलेली आहे. त्यांच्या विचाराचे संचालक मंडळ येथे कार्यरत आहे. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेला झालेल्या घावपळीमुळे आता स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित केले असून, संघटन वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दोनच दिवसांपूर्वी बारामती तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने दूध व कांद्याच्या दराबाबत सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here