सातारा : सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना कार्यस्थळावर गुरुवार, दि. १६ ते शनिवार, दि. १८ या कालावधीत पुरुषांची खुल्या गटातील भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कराड तालुका साखर कामगार युनियन, गणेश शिवोत्सव मंडळ आणि कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथ्या क्रमांकांना अनुक्रमे ५० हजार १११ रुपये व करंडक, ४० हजार १११ रुपये व करंडक, ३० हजार १११ रुपये, २० हजार १११ रुपये, अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड यासाठी प्रत्येकी दोन हजार १११ रुपये व करंडक, अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा सहकारमहर्षी जयवंतराव भोसले क्रीडानगरीत खेळवली जाणार आहे.