छत्रपती संभाजीनगर : सह. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, मराठवाडा विभाग (छत्रपती संभाजीनगर) आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA, पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कारखाने व अर्कशाळेतील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विषयक एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे कि, या कार्यशाळेचे उद्घाटन कृषीरत्न बी.बी. ठोंबरे (अध्यक्ष, नॅचरल उद्योग समुह व वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, पुणे ) यांच्या हस्ते होणार आहे. तर दिपक पोकळे (संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई) हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेला अ.अ. घोगरे (सह. संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, कार्य. १), प्र.वि. सुरसे (सह. संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, मराठवाडा विभाग, छत्रपती संभाजीनगर) अं.बा. खराडे (उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, पुणे कार्य. १) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ही कार्यशाळा शुक्रवार, दि.१७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ५.३० पर्यंत हॉटेल उत्सव विवेकानंद कॉलेज समोर, MIDC, लातूर येथे होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.