राज्यातील साखर कामगारांच्या वेतन वाढीबाबत त्रिपक्षीय समितीची सकारात्मक चर्चा

अहिल्यानगर : साखर कामगार संघटनेने ४० टक्के वेतनवाढीची मागणी केलेली आहे. यामुळे सध्या साखर कारखान्यांत कामगारांचे थकीत वेतन इत्यादी बाबतची माहिती संकलित करून पुढील बैठकीस ती सादर केली जाईल, असा निर्णय त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बुधवारी साखर कामगारांच्या वेतनवाढ व इतर प्रलंबित प्रश्नांसाठी गठीत केलेल्या समितीची मुंबईत बैठक झाली. समितीचे अध्यक्ष पी. आर. पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री राजेश टोपे यांसह समितीचे सदस्य उपस्थित होते. तर साखर आयुक्त कुणाल खेमनर यांनी बैठकीत ऑनलाईन सहभाग नोंदवला.

दैनिक सार्वमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या बैठकीत साखर कामगारांच्या प्रश्नावर समाधानकारक चर्चा झाली असून महिनाअखेरीस परत बैठक आयोजित करण्याचे यावेळी ठरले. यावेळी किमान चार बैठकांमध्ये वेतनवाढ व इतर मागण्यांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे ठरले. या बैठका फेब्रुवारीअखेर घेण्यात येणार आहेत. संगमनेर कारखान्याचे चेअरमन प्रताप ओव्हाळ, खाजगी कारखान्याचे प्रतिनिधी अविनाश जाधव, कामगार संघटनेचे प्रतिनिधी तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले, राऊ पाटील, अविनाश आपटे, आनंदराव वायकर, पी. के. मुडे, सत्यवान शिखरे, शिवाजी औटी, प्रदीप बनगे, राजेंद्र तावरे, डी. एम. निमसे, युवराज रणवरे, अशोकराव पवार, कामगार कल्याण आयुक्त रविराज ईळवे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here