कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याच्या (गोडसाखर) चालू गळीत हंमागात उत्पादित झालेल्या १ लाख ३१ हजाराव्या साखर पोत्यांचे पूजन कारखाना कार्यस्थळावर झाले. जिल्हा बँकेचे संचालक व कारखान्याचे बँक प्रतिनिधी संतोष पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी जिल्हा बँकेतर्फे ‘गोडसाखर’मध्ये बँक प्रतिनिधी संचालकपदी निवड झाल्याबद्दल पाटील यांचा सत्कार केला. पाटील यांनी बँकेच्या माध्यमातून कारखान्याला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
चालू गळीत हंगामात कारखान्याने आजअखेर १ लाख २३ हजार ४९० टन उसाचे गाळप झाले असून, १ लाख ३१ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आसवनी विभागात ७ लाख ८६ हजार ४४४ लिटर अल्कोहोलचे उत्पादन झाले असून, वेळेत ऊस बिले, तोडणी वाहतुकीची बिले, हंगामी कंत्राटदारांची बिले, कर्मचारी पगार दिले जात आहेत. उत्पादक शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस कारखान्याला गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.