सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम २०२३-२४ करीता वसंतदादा शुगर इनिस्टट्यूट (व्हीएसआय) यांचा दक्षिण विभागातील प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा गुरूवार दि. २३ रोजी होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने चौफेर प्रगती केली आहे. कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ करीता वसंतदादा शुगर इनिस्टटयूट यांचा दक्षिण विभागातील प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार झाला आहे.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, या पुरस्काराने अजिंक्यतारा कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली असून, अजिंक्यतारा कारखान्याची मान आणखी उंचावली आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत हरी साळुंखे, व्हाईस चेअरमन नामदेव विष्णू सावंत, सर्व मा. संचालक व कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.