मनमानी करणाऱ्या गुऱ्हाळघरांवर लगाम घालण्यासाठी सरकार निर्णय घेणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४८ व्या सर्वसाधारण सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुळ निर्मितीचा वाढता व्याप बघता कमी गुणवत्तेचा गूळ निर्मिती करणाऱ्या गुऱ्हाळघरांवर काही बंधने घालण्यासाठी राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणावर गूळ निर्मितीचे काम चालायचे, पण आता काही गुऱ्हाळघरांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. कधी सुरू करता आणि कधीही बंद करतात. त्यामुळे त्यावर बंधन आणण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार योग्य निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कारखानदारांकडून ऊसाला वेळेत तोड मिळत नसल्याने शेतकरी पर्याय म्हणून गुऱ्हाळाकडे वळतात. परंतु गुऱ्हाळ मालकांचा मनमानी कारभार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाचक ठरतो. त्यामुळे शेतकरी तक्रार करतात. अर्थात यामध्ये साखर कारखानदारांचा मनमानी कारभारदेखील ऊस उत्पादकांना छळतो, हेही वास्तव आहे, असेही ते म्हणाले. यावेळी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, ‘व्हीएसआय’चे व्हाईस चेअरमन दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कॉँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here