कोल्हापूर – शेतकऱ्यांना वैद्यकीय मदतीसाठी गुरुदत्त किसान कार्ड : अध्यक्ष माधवराव घाटगे

कोल्हापूर : श्री गुरुदत्त शुगर्स शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या पाठबळावर गुरुदत्त शुगर्सने साखर उद्योगात गरुडभरारी घेतली आहे असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या ‘गुरुदत्त किसान कार्ड’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी दोन लाखांच्या धनादेश वाटपप्रसंगी ते बोलत होते. कार्यकारी संचालक राहुल घाटगे, संचालक शिवाजीराव माने-देशमुख, शिवाजी सांगले आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष घाटगे यांनी सांगितले की, कारखान्याच्या गुरुदत्त किसान कार्ड योजनेंतर्गत आतापर्यंत दहा हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. २३४ शेतकऱ्यांना विविध शस्त्रक्रिया व उपचारांसाठी प्रत्यक्ष मदत देण्यात आली आहे. गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये योजनेतून ९४ शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचारांसाठी १६ लाख २५ हजार रुपयांची मदत झाली आहे. हंगाम २०२४ – २५ मध्ये किसान कार्ड योजनेत शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांनी ऊस योजनेत नोंद करून गळीतास कारखान्यास पाठवावा असे आवाहन घाटगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here