सांगली : ‘श्रीपती शुगर अँड पॉवर ‘तर्फे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सर्व रोगनिदान शिबिर

सांगली : श्रीपती शुगर अँड पॉवर लि. (डफळापूर-कुडणूर) कार्यस्थळी सर्व रोगनिदान शिबिर झाले. ‘श्रीपती शुगर’ व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यातर्फे कारखाना क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सर्व रोगनिदान शिबिर झाले. शिबिरामध्ये २५० कर्मचारी व अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली. तीन दिवस शिबिर झाले.

श्रीपती शुगर ऊस उत्पादक, तोडणी वाहतूक कर्मचारी, कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रम राबवत असते. आमदार डॉ. विश्वजित कदम व महेंद्र लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापन कामकाज करत असून गळीत हंगाम जोरात सुरू असल्याचे सरव्यवस्थापक महेश जोशी यांनी सांगितले. डॉ. पंकज ढवळे, डॉ. शरद सावंत, डॉ. आकाश शिंदे व ए. ए. वाघमोडे, बी. एच. माने, सरव्यवस्थापक महेश जोशी, यशवंत जाधव, प्रवीण जगताप, एच. आर. रणजित जाधव, दीपक वाणी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here