हापुड : राज्य सरकारने अद्याप उसाचा दर निश्चित केलेला नाही. तर सिंभावली-ब्रजनाथपूर साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ९०.८५ लाख क्विंटल ऊस खरेदी केला आहे. कारखान्याने उसाच्या स्लिपवर अजूनही दर नमूद केलेला नाहीत. हंगाम संपण्यास दोन महिने शिल्लक असताना, जिल्ह्यातील सिंभावली आणि ब्रजनाथपूर या दोन्ही साखर कारखान्यांनी अद्याप ऊस बिले अदा केलेली नाहीत. दोनच दिवसांपूर्वी सिंभावली साखर कारखान्याने मागील वर्षीची थकीत बिले दिली आहेत. जुन्या दराचा विचार केला तर यंदाच्या हंगामातील ३१५ कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना अद्याप मिळायची आहेत.
ब्रजनाथपूर कारखान्याकडे आधीच्या गाळप हंगामातील १७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. चालू गाळप हंगामात दोन्ही कारखान्यांनी ९०.८५ क्विंटल ऊस खरेदी केला आहे. जुन्या दराने विचार केला तर अंदाजे ३१५ कोटी रुपयांचा ऊस उधारीवर खरेदी करण्यात आला आहे. मेरठ, बुलंदशहर, गाझियाबाद येथील सिंभावली आणि ब्रजनाथपूर साखर कारखान्यांमधूनही ऊस खरेदी केला जातो. याशिवाय, हापूरमधील ३२ हजार शेतकरीही कारखान्याला ऊस पुरवतात. कारखान्यांनी आतापर्यंत ९०.८५ लाख क्विंटल ऊस खरेदी केला आहे. यामध्ये सिंभावलीने ६४ लाख आणि ब्रजनाथपूरने २६ लाख ८५ हजार क्विंटल ऊस खरेदी केला आहे. याचे पैसे मिळालेले नाहीत असे शेतकऱ्यांनी सांगितले.