सातारा : ‘जयवंत शुगर्स’चा वजनकाटा अचूक, धावरवाडीत भरारी पथकाच्या तपासणीत स्पष्ट

सातारा : धावरवाडी येथील जयवंत शुगर्सच्या वजनकाट्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने अचानक भेट देऊन तपासणी केली. पथकाच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले.

निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडे, वजनमापे निरीक्षक योगेश अग्रवाल, विशेष लेखा परीक्षक एस. पी. शिंदे, एस. आर. सानप, स्वाभिमानीचे उत्तम साळुंखे, शरद जोशी शेतकरी संघटनेचे तात्यासाहेब पाटील, बळीराजाचे सुनील कोळी, दीपक पाटील, रयत क्रांतीचे अशोक लोहार, विशाल पुस्तके यांनी संयुक्तपणे जयवंत शुगर्सला अचानक भेट देऊन कारखान्याच्या ऊस वजनकाट्याची तपासणी केली. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. या वेळी कारखान्याचे अधिकारी अरुण खटके, नाथा कदम, सुरक्षा अधिकारी विठ्ठल भोसले, सतीश सोमदे, रविराज बनसोडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here