नवी दिल्ली :देशाच्या साखर आणि इथेनॉल उद्योगातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चिनीमंडी’तर्फे आयोजित शुगर-इथेनॉल आणि बायोएनर्जी इंडिया कॉन्फ्रेंस (SEIC 2025) मध्ये ओंकार साखर कारखाना परिवाराला शुगर-इथेनॉल आणि बायोएनर्जी (Sugar-Ethanol & Bioenergy International Award / SEIA 2025) या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.बॉलीवूड अभिनेत्री हिना खान यांच्या हस्ते संचालक ओमराजे बोत्रे-पाटील यांनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
शुगर-इथेनॉल आणि बायोएनर्जी इंडिया कॉन्फ्रेंस (SEIC 2025) मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. ओंकार परिवाराने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व कर्मचारी, ऊसतोड कामगारांसाठी भरीव योगदान दिले आहे. आर्थिक प्रगती साधून सर्व युनिटने त्या त्या भागाचा कायापालट केला आहे. याची दाखल घेऊन ‘चिनीमंडी’तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ओंकार परिवाराने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात साखर कारखाने गतीने चालू करून ऊसाचे गाळप केले आहे. परिवाराचे चेरअमन बाबूराव बोत्रे-पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील, संचालक प्रशांतराव बोत्रे-पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपुर्वी बंद पडलेल्या साखर कारखान्यांना ऊर्जीतावस्थेत आणले आहे. शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न सोडवून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे.हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत सामाजिक उपक्रम राबवले आहेत. दरम्यान, या पुरस्काराबद्दल ऊस उत्पादक, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, वाहतुकदारांनी बोत्रे- पाटील यांचे अभिनंदन केले.