कोल्हापूर : काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने एक जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ अखेरची ऊस बिले खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली. तोडणी-वाहतूकदारांची बिलेही संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली. उद्यापासून बँकेत रक्कम मिळू शकेल, असे प्रसिद्धी पत्रकातून सांगितले.
एक फेब्रुवारीपासून गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३,२०० दर जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी कारखान्याला पाठवावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. शेतकऱ्यांना वेळेत ऊस बील देणे यावर कारखाना प्रशासनाचा भर सल्याचे त्यांनी सांगितले.