राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांसाठी खास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्या हस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी विश्वास साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील म्हणाले की, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख शुद्ध ऊस रोपे उपलब्ध करून देणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी शुद्ध बियाणे, खत व पाण्याचे योग्य नियोजन महत्वाचे आहे. शेतकऱ्यांनी बाळ भरणी करावी. यातून एकरी ४-५ टन उसाचे उत्पादन वाढू शकते.

सुजयकुमार पाटील म्हणाले, “कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जात आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, संचालक शैलेश पाटील, हणमंतराव माळी, युवराज पाटील, कलाकार मानधन समितीचे माजी अध्यक्ष एम. जी. पाटील, संपतराव पाटील, आनंदराव पाटील प्रमुख उपस्थित होते. विठ्ठल पाटील यांनी योजनांची माहिती दिली. संजय पाटील, नितीन पाटील, पोपट पाटील, उत्तम माने, प्रल्हाद शिंदे, बी. के. पाटील, अशोक पाटील, संग्राम पाटील, जयकर साटपे उपस्थित होते. संचालक शैलेश पाटील यांनी स्वागत केले. युवराज पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here